मुंबई – बच्चन खानदानाची बहू ऐश्वर्याला पती अभिषेक व कन्या आराध्या यांच्यासह स्वतंत्र बिर्हाचड थाटायचे असल्याचे वृत्त आहे. २००७ साली लग्न झाल्यापासून ऐश्वर्या सासू सासर्यासमवेत एकत्रच राहात आहे. टिपिकल सांस बहू झगडे बच्चन यांच्याही घरात सुरू झाले आहेत व त्यामुळे ऐश्वर्या वेगळे बिर्हाहह थाटण्यासाठी अभिषेकच्या मागे लागली असल्याचे अंतर्गत वर्तुळातून समजते.
बाहेर सासू जया व सून ऐश्वर्या यांच्यात चांगलीच गट्टी दिसत असली तरी प्रत्यक्षात जया ऐश्वर्याच्या व्यावसायिक बाबींतही ढवळाढवळ करते आणि तिची ऐश्वर्यावर सतत नजर असते असे समजते. ऐश्वर्याला हे अजिबात पसंत नाही. ऐश्वर्या, अभिषेक ,कन्या आराध्या नुकतेच दुबईवरून सुटी घालवून परतले आहेत आणि या सुटीत त्यांच्याबरोबर ऐश्वर्याचे आईवडिल, भाऊ वहिनी होते या गोष्टीलाही विशेष महत्त्व दिले जात आहे.