पवारांना हवीय त्रिशंकूू संसद-मुंडे

कोल्हापूर -केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा पंतप्रधानपदावर डोळा आहे. त्यातूनच आगामी लोकसभा निवडणुकांत कुठल्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू नये. संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण व्हावी, अशी त्यांची इच्छा असल्याचा आरोप आज भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. मुंडे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

यूपीए आणि एनडीएपैकी कुणालाच स्पष्ट बहुमत मिळू नये असे पवारांना वाटते. सत्तेजवळ पोहोचू शकणार्‍या आघाडीला बहुमतापेक्षा 8 ते 9 जागा कमीच मिळाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. त्रिशंकू स्थितीत आपल्याला पंतप्रधान बनता येईल, अशी आकांक्षा पवार बाळगून आहेत. मात्र, त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे भाकित मुंडे यांनी केले.

या पत्रकार परिषदेला रिपाइंचे (आठवले गट) नेते रामदास आठवले हेही उपस्थित होते. अजित पवारांसाठी खटाटोप उपमुख्यमंत्री असलेले पुतणे अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात कुणी प्रतिस्पर्धी राहू नये यासाठी पवारांचा खटाटोप सुरू आहे. त्यातूनच ते राज्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणुका लढवण्यास भाग पाडत आहेत, असा दावाही यावेळी मुंडे यांनी केला.

Leave a Comment