रणबीरच्या कुंटूबांनी केली दीपिकाची स्तुती

बॉलीवडूचा सुपरस्टार अभिनेता रणबीरच्या‍ कुटूंबाची अभिनेत्री दीपिका बाबत असलेली नाराजी दूर झाली आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी अभिनेता ऋषि कपूर व नीतू यांने दीपिकाचा रिलीज झालेल्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ च्याप स्पेशल स्क्रीनिंगसाठी आले होते. त्याचवेळी अभिनेत्री दीपिकाने ऋषि आणि नीतू कपूर यांची गळाभेट घेतली.

त्यावेळी दीपिकाने स्वाताहून पुढे जावून नीतू आणि ऋषि कपूर यांची मुलाखत घेतली. यावेळी ऋषिने दीपिकाचे कौतुक करताना, ‘वेल डन बेटा, कीप इट अप। गॉड ब्लैस यू!’ अशा प्रकारचया तिला शुभेच्छा दिल्या. रणबीर आणि दीपिका रिलेशनशीपमधून वेगळे झाल्यानंतर चैट शो मध्येच रणबीरच्या विरूध्द दीपिकाने केलेल्या कंमेटसमुळे रणबीरचे आई वडिल नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा आता आगामी काळात दीपिका सोबत कधीच काम करनार नसल्याचे जाहीर केले होते.

काही दिवसांपूर्वी ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमात रणबीर-दीपिका सोबत काम केल्यांनतर त्यांची नाराजी दूर झाली असल्याचे समजते. एवढेच नव्हेे तर ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमानंतर स्वताहून रणबीर आणि दीपिकाने यापूढील काळात सिनेमात एकत्र काम करण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment