विजय पांढरे करणार आता राजकारणात एंट्री

नाशिक- काही दिवसांपूर्वीच सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे लवकरच आता राजकारणात एंट्री मारणार आहेत. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याकचे समजते. या बातमीला त्यांनी ही दूजोरा दिला असल्याने आता ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार हे निश्चीत मानले जात आहे.

जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता असलेले पांढरे हे ३० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. पांढरेंच्या या पक्ष प्रवेशामुळं महाराष्ट्रात आम आदमी पक्षाचे वजन वाढणार आहे. त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशामुळं सिंचन घोटाळ्यातील काही गुपितं बाहेर पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांकनी सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यांजच्याीमुळे राज्यातील काही नेतेमंडळीना सळो की पळो असे झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता.

त्यामुळे नागपूर येथे होत असलेल्याय आगामी अधिवेशनात सत्ताधा-यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे सिंचन घोटाळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त बसण्याची शक्यता आहे. त्यायमुळे त्यांमना आगामी काळात सावध रहावे लागणार आहे.

Leave a Comment