पुण्यात अर्पाटमेंटमध्ये आग, एकाचा मृत्यू

पुणे- पुण्यातल्या नवी पेठ परिसरातील एका अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहने जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना घडली. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पुण्याच्या नवी पेठ भागातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या अनुदत्त इमारतीला शनिवारी पहाटे आग लागली. आगीमुळे या आवारातील २५ दुचाक्या आणि दोन सायकल जळून खाक झाल्या. दरम्यान, पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

घटनेनंतर काही वेळातच या अपार्टमेंटमध्येव अगनीशामक दलाचे जवान दाखल झाले. त्यांहनी लगेचेच ही आग आटोक्याशत आणली. त्या‍मुळे मोठे हानी टळली आहे. या आगीत एका रहिवाशाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारारसाठी हॉसिप्टलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment