अँशेस कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

ब्रिस्बेन – अँशेस मालिकेतील पहिल्यााच कसोटी सामन्यायवर तिस-या दिवशीच ऑस्ट्रेलियाने २२४ धावाची आघाडी घेत मजबूत पकड निर्माण केली आहे. मिशेल जॉन्सनने चार बळी व रेयॉन हॅरिसने तीन बळी घेतले. या वेगवान मार्याससमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त १३६ धावांतच शरणागती पत्करली. पहिल्या डावात २२५ धावा काढणार्या् ऑस्ट्रेलियन संघाने दुस-या डावातही सावध सुरुवात करत सामन्याच्या तिस-या दिवशी ३८५ धावांची आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाची कालची नाबाद जोडी हॅडिन (७८) आणि हॅरिस (४) ने दुसर्याघ दिवसाच्या खेळास ८ बाद २७३ धावांवरून पुढे प्रारंभ केला. हॅडिनने सावध खेळी करत शतकाकडे आगेकूच केली; परंतु ९४ धावांवर खेळत असताना कार्बेरीने त्याला धावबाद केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २९५ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने प्रभावी मारा करत ८१ धावा देत ऑस्ट्रेलियाचे सहा गडी बाद केले. जेम्स अँडरसनने दोन गडी बाद केले.

इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक राहिली. सलामीवीर अँलेस्टर कुक १३, जॉन्सनने ट्रॉटला १० धावांवर बाद झाला. पीटरसनने (१०) निराशा केली. मायकेल कार्बेरीने ४० धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद २९५ धावा. इंग्लंड पहिला डाव सर्वबाद १३६ धावा. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव सहा बाद ३२६ धावा.