
पुणे , : भारत आणि दक्षिण कोरियामधील द्विपक्षीय व्यापार २ ० अब्ज डॉलर पर्यंत पोचला असून उभय देशातील व्यापार संबंध सुधारण्यास कोट्राची मोठी मदत मिळते आहे असे दक्षिण कोरियाचे वाणिज्य दूत सोक गु जांग यांनी येथे सांगितले.

पुणे , : भारत आणि दक्षिण कोरियामधील द्विपक्षीय व्यापार २ ० अब्ज डॉलर पर्यंत पोचला असून उभय देशातील व्यापार संबंध सुधारण्यास कोट्राची मोठी मदत मिळते आहे असे दक्षिण कोरियाचे वाणिज्य दूत सोक गु जांग यांनी येथे सांगितले.
कोट्रा – “कोरिया ऑटोपार्ट प्लाझा २०१३” या व्यावसायिक प्रदर्शना ची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली श्री बि. बि. पारेख (टाटा मोटर्स), श्री कल्पेश पाठक,( फियाट इंडिया), श्री एस के जैन, (एम .सी .सी आय.ए अध्यक्ष) यावेळी उपस्थित होते.· या प्रदर्शनास टाटा मोटर्स,फियाट इंडिया, आणि एम .सी .सी आय.ए यांनी सहकार्य केले आहे.सध्या पुण्यामध्ये कोरियातील ६० कंपन्या कार्यरत आहेत.
जांग सोक गु पुढे म्हणाले “कोरियातील ऑटो पार्ट त्याच्या उच्च दर्जा व प्रती साठी जगात प्रसिद्ध आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोरियातील ऑटो व्यावसायिक व भारतीय ग्राहक यांच्यात समन्वय साधणे हा उद्देश आहे.” ते पुढे म्हणाले की पुणे ही झपाट्याने वाढणारी बाजारपेठ आहे , तसेच येथे ऑटो पार्टला प्रचंड मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही अशा कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. यातून भारतीय व कोरियन व्यावसायिकात चांगले संबंध निर्माण होतील व ते नक्कीच फलदायी असणार”.
कोट्रा संचालक योंग चांग किम, म्हणाले “कोत्रा हे कोरियन निर्यात कर्ते व ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. याशिवाय ते विदेशी ग्राहकांना उत्तम माल मिळवून देण्यास मदत करतात. त्यासाठी ते व्यवसायिक समन्वय आंतरराष्ट्रिय प्रदर्शन व ई- ट्रेड असे कार्यक्रम आयोजित करतात.”
कोत्रा हे कोरियन एम्बसी चे ट्रेड ऑफिस आहे, जे अशा कंपन्यांसाठी एक आदर्श व्यासपीठ आहे. कोत्रा च्या व्यावसायिक प्रदर्शनाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. व प्रत्येक वर्षी यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. व त्याची लोकप्रियता वाढत आहे.