रामगोपाल वर्माचे महिलाविषयी धक्कादायक वक्तव्य

मुंबई- बॉलीवूडचा फेमस डिरेक्टर रामगोपाल वर्माने महिलांविषयी धक्कादायक वक्तव्य केल्याचे उघडकीस आले आहे. अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्तीने लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर रामूने अत्यंत धक्कादाक उत्तर तीला दिला आहे. जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्याच्या या वक्तव्यातने आगामी काळात तो चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना रामगोपाला वर्मा म्हणाला, ‘ मी लग्न करणा-यासारखा नाही. मी महिलांना फक्त संभोगासाठी वापरतो, आणि मला खात्री आहे की तसे तुला वाटत नाही.’ असे आश्चर्यकारक उत्तर दिले होते. दिग्दर्शक राम गोपाल वर्माने अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने लिहिलेल्या ‘ड्रामा क्वीन’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. त्यामध्ये सुचित्राने ‘रामू’बद्दल एक प्रकरण लिहिले आहे. तिने ‘रामू’ला लग्नाची मागणी घातल्यावर तिला रामूकडून धक्कादायक प्रतिसाद मिळाला होता, असा दावा सुचित्राने केला आहे.

सुचित्रा, मला वाटते तुझा माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे. आपण अजिबात एकसारखे नाही. माझा विवाहसंस्थेवर विश्वास नाही. मला स्त्रियांचे शरीर आवडते. माझ्या मते, महिलांना पाहिले जावे, त्यांना ऐकू नये, अभिनेत्री सुचित्राने दिग्दर्शक राम गोपाल वर्माबद्दल केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आले आहे. यामुळे आगामी काळात राम गोपाल वर्मा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.