क्रिकेटच्या देवाचे बिहारमध्ये मंदिर उभारणार

पाटणा- क्रिेकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकरचे नाव घेतले जाते. त्यामुळेच आता सचिन तेंडूलकर नावाच्या‍ देवाचे आता मंदिर होत आहे. आगामी काळात बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही बुधवारी रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच केली जाणार आहे.

बिहारमध्ये पाटण्यापासून १०० किलोमीटरवर असलेल्या कैमूर जिल्ह्यातील एका गावात सचिनचे मंदिर उभारण्याचा संकल्प केलेला आहे. सचिनचा मोठा चाहता असलेला भोजपुरी नायक मनोज तिवारीने कैमूर जिल्ह्यात असलेले अथरवलिया हे गाव मनोज तिवारीचे जन्मगाव आहे. या त्यारच्याम जन्मनगावातच मंदिर उभारले जाणार आहे. मात्र, मंदिर बनविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी मिळून घेतला असल्याच तिवारी यांचे म्हणणे आहे.

राजस्थानमधील एका कारागिराकडे सचिनची संगमरवरी दगडातील सव्वापाच फुटांची मूर्ती घडविण्याचे काम सोपविण्यात आले असल्यागचे समजते. मंदिरासाठी अंदाजे ७० लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे. मनोज तिवारी यांच्या माहितीनुसार, ६००० चौरस फूट जागेवर बनणा-या या मंदिराच्या गाभा-यात सचिन तेंडुलकरची मूर्ती स्थापन करण्यात येईल. निळी जर्सी आणि हातात वर्ल्डकप असलेली ही मूर्ती आहे. सचिनसोबतच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि युवराजसिंग यांचीही छोटी मूर्ती मंदिरात ठेवणार असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Comment