सलमान सोनाक्षीवर नाराज

अभिनेता सलमान खान सोबतच्या ‘दबंग’ या सिनेमापासून बॉलीवुड करियरची सुरूवात करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर सलमान खान नाराज असल्यानचे समजते. याचा खुलासा करताना सोनाक्षीने सलमान नारज नसल्यामचे स्पनष्टे केले आहे. आगामी काळात येत असलेल्याक ‘दबंग-३’ साठी सलमान नवीन अभिनेत्रीचा शोध घेत असल्याचे समजते.

आगामी काळात येत असलेल्याच ‘दंबग-३’ या सिनेमासाठी सोनाक्षीला वगळून सलमान नवीन हिरोइनचा शोध घेत असल्याधचे समजते. तसे पाहिले तर अभिनेता सलमान खानकडे एक्ट्रेसेसचे ऑप्शन कमी नाही आहेत. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्यात ‘दबंग-३’ साठी हिरोइन म्हणून करीना तयारी करीत असल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अरबाज खानच्या किक या सिनेमात काम करण्यास नकार दर्शविला होता. त्या‍वेळी सोनाक्षीकडे फारसा वेळ नसल्यांने तिने काम करण्यास नकार दर्शविला होता. तसे पाहिले तर गेल्याव काही महिन्यापासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कामात व्यस्त आहे. सोनाक्षीने नकार दिल्यानंतर जैकलीनला ‘किक’ या सिनेमासाठी साइन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’मध्ये करीनाने सलमान सोबत दबंग सिनेमात काम करण्या ची इच्छा प्रदर्शीत केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात येत असलेल्या ‘दबंग-३’ या सिनेमात अभिनेत्री बदलली जाणार हे निश्चीत मानले जात आहे.

Leave a Comment