सचिनच्या पार्टीला दिग्गजाची हजेरी

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकरने मुंबईत एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. सचिनने आयोजीत केलेल्या या पार्टीला क्रिकेटमधील नामवंत मंडळीसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीनी हजेरी लावली आहे.

मुंबईतीलया वॉटरस्टोन हॉटेलमध्ये हा सोहळा रंगला होता. क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी आठच्या सुमारास सचिन तेंडुलकर वॉटरस्टोन हॉटेलमध्य़े दाखल झाला होता. त्याच्या सोबत सचिनचे पूर्ण कुंटूबदेखील या सोहळयाला आवजूर्न उपस्थित होते.

सचिनने आयोजीत केलेल्या या सोहळ्याला सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर, बीग बी अमिताभ बच्चन, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुनिल गावसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

Leave a Comment