कर्णधार सॅमीच्या कामगिरीवर लॉइडची नाराजी

पुणे – वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांनी सध्याचा कर्णधार डॅरेन सॅमीच्या कामगिरीवर नाराजी व्यकक्तव केली आहे. कर्णधार सॅमीच्या कामगिरीबाबत त्यांनी या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सॅमीच्या पदाबाबत पुनर्विचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कोलकाता कसोटीत पाच बाद १२० अशी अवस्था असणा-या भारतीय संघावर दबाव टाकण्यात वेस्ट इंडीज अपयशी ठरला, असे ते म्हणाले.

वेस्ट इंडीजला सलग दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा, सलग २७ कसोटी सामन्यांमध्ये पराभूत न होणारा अशी ख्याती असलेल्या लॉइडचा समावेश जगातील सर्वोत्तम क्रिकेट कर्णधारांपैकी एक होतो. लॉइड हे मात्र सॅमीच्या कामगिरीवर नाराज आहे. पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी ते आले. संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे या वेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लॉइड म्हणाले, ‘भारताविरुद्ध कसोटी मालिकेत विंडीजची कामगिरी अत्यंत खराब झाली. सॅमीने कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. संघातील युवा खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळणे गरजेचे आहे.’

Leave a Comment