रामलीलाने केला ५० कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : संजय लीला भन्साळीच्या राम लीला या सिनेमाने आतापर्यंत चांगला बिझनेस केला आहे. सोमवारपर्यंतच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने तब्बल ५० कोटीचा टप्पा पार केल्याचे बॉक्स ऑफिस जाणकारांकडून सांगितले जात आहे. या सिनेमाने ५० कोटीचा टप्पा पार केल्याने सर्वच मंडळी खूष झाली आहे.

सोमवारी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही राम लीलाचं तोंड भरून कौतुकही केले आहे. आपल्या ब्लॉगमध्ये तसंच ट्वीटरवरूनही अमिताभ बच्चन यांनी रामलीला या संजय लीला भन्साळीच्या सिनेमाचे पुरेपूर कौतुक केले आहे. संजय लीला भन्साळीचा जिनीयसनेस, दीपिका आणि रणवीरचे फॅशन आणि सुप्रिया पाठकचा कसदार अभिनय आणि रिचा चढ्ढाचा रांगडेपणा म्हणजे रामलीला आहे, असं ट्वीट बिग बी अमिताभने केला होता.

शेक्सपीयरच्या रोमियो-ज्युलिएटवर गोलियों की रासलीला, राम-लीला हा सिनेमा आधारित असल्याचा दावा नंतर करण्यात आला असला तरी सुरवातीला रामलीला या नावामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी त्याविरूद्ध आघाडी उघडली होती. कदाचित या वादाचा या सिनेमाला फायदाच झाला असल्याची शक्यताही आता काही ट्रेड पंडित वर्तवत आहेत. धार्मिक संघटनांच्या आक्षेपामुळे या सिनेमाला दोन वेळा नावही बदलावं लागलं होतं. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने तब्बल ५२ कोटीचा बिझिनेस केला आहे. येणाऱ्या काही दिवसात रामलीला आणखी गर्दी जमविण्यात यशस्वी होईल, असा विश्वास ट्रेड पंडितांना वाटतो.

Leave a Comment