आगामी काळात बॉलीवुड अभिनेत्री विद्या बालन “बॉबी जासूस” या सिनेमातून अभिनेता अली फजल सोबत सिल्वर स्क्रीनवर रोमान्स करताना दिसणार आहे. अभिनेत्री दीया मिर्जा तिच्या होम प्रोडक्शनच्या बॅनरखली अभिनेत्री विद्या बालन सोबत ‘बॉबी जासूस’ हा सिनेमा करीत आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीया मिर्जा, जायेद खान आणि साहिल संधा यांनी संयुक्तरित्या
प्रोडक्शन कंपनीची निर्मिती केली आहे. या नवीन कंपनीच्या बैनरखाली विद्याचा बॉबी जासूस हा सिनेमाची निर्मिती केली जात आहे. यापूर्वी अभिनेत्री विद्या बालनने २०११ साली लव ब्रेकअप जिंदगी हा सिनेमा यातर केला होता.
‘बॉबी जासूस’मध्ये अभिनेत्री विद्या बालन एक महिला जासूसची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दीया मिर्जा ही या सिनेमासाठी विद्याच्या अपोजिट हीरोचा शोध घेत होती. तिचा शोध आता संपलाअ सून नवीन चेहरा असलेल्या अली फजलची तिने विद्याच्या अपोजिट साइन केले आहे. अभिनेता अली फजल याचा काही दिवसांपूर्वी ‘फुकरे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आगामी काळात येत असलेल्या ‘बॉबी जासूस’ या सिनेमाची शूटिंग २५ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.