टीम इंडियाचा मालिका विजयाने सचिनला निरोप

मुंबई- वेस्ट इंडीजच्याल संघाने दुस-या कसोटी सामन्यात जेमतेम तीन दिवसात पराभव पत्करला आहे. विंडीज संघाने लाजीरवाणी कामगिरी करताना मुंबईतील दुसरा कसोटी सामन्यायत पराभव स्वीाकारत मालिकाही हरली आहे. सचिनच्या २०० व्या कसोटी सामन्यात पाहुण्यांना एकाही डावात २०० चा आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाने मात्र विंडीजचा दोन्ही कसोटी सामन्यात डावाने पराभव केला आहे. दुस-या कसोटी सामन्यासह मालिका जिंकताना टीम इंडियाने सचिन तेंडूलकरला उत्साही वातावरणात निरोप दिला.

मुंबईच्या दुस-या कसोटी सामन्या‍त शुक्रवारीच विंडीजची अवस्था ३ बाद ४३ अशी केविलवाणी झाल्यामुळे विंडीजचा तिस-याच दिवशी लज्जास्पद पराभव होणार हे निश्चिित झाले होते. पाहुण्यांनी उपाहारापूर्वीच टीम इंडियापूढे गुडघे टेकले. विंडीजचा १८७ धावांत खुर्दा उडवून टीम इंडियाने मुंबई कसोटीसह मालिकाही जिंकली. टीम इंडियाने पहिली कसोटी डाव आणि ५१ धावांनी जिंकली होती तर दुस-या कसोटीत डाव आणि १२६ धावांनी विजय नोंदवत त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला डावाच्या आणि मालिकेच्या विजयाने निरोप दिला.

केविलवाण्या विंडीजला आणखी एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागणार हे पहिल्याच दिवशीच दिसले होते. त्यांचा खेळ पाहावत नव्हता. ते जरा तरी प्रतिकार करतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी अपेक्षाभंग केला. शुक्रवारच्या ३ बाद ४३ वरून खेळ सुरू करणा-या विंडीजने सुरुवात छान केली, पण ही जोडी फुटताच त्यांना धाप लागली. शंभरीतच त्यांचे ६ फलंदाज बाद झाले. तेव्हा १५० वा कसोटी सामना खेळणा-या शिवनरीन चंदरपॉलने दिनेश रामदिनबरोबर संघाची पडझड रोखली, पण त्यांचे फिरकीपुढे फार काळ चालले नाही. चंदरपॉल बाद झाला आणि टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवून २०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या सचिनला निरोप दिला .

Leave a Comment