छोटया पडद़यावरील अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जी शनिवारी रियल्टी शो ‘बिग बॉस’मधून बाहेर पडली आहे. तिच्या पूर्वी ‘बिग बॉस’मधून दहा जण बाहेर पडले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून बिग बॉसच्या घरात राहत असलेली अभिनेत्री प्रत्यूषा बाहेर पडल्यानंतर म्हनाली, तिला आतमधील सर्वच सहभागी स्पधकाची आठवण येत आहे.
अभिनेत्री प्रत्यू्षा म्हणाली, ‘मी जरी आता बाहेर पडले असले तरी मला ‘बिग बॉस’च्या घराची खूप आठवण येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी ‘बिग बॉस’च्या घरी राहत असल्याने मला या घराची आता सवय झाली आहे. आता मला बाहेर पडल्यानंतर जरी ती घराच्याची आठवण होत असली तरी मला आईची खूप आठवण येत होती. बाहेर पडल्यानंतर मी रिलक्स झाली आहे.
यावेळी प्रत्युषा म्हणाली आतापर्यंत मला सहा वेळा सर्वांनी मिळून नॉमिनेट केले आहे. पण मला नॉमिनट का करण्यात आले याचे कारण मात्र समजू शकले नाही. यावेळी प्रत्यूषाशिवाय घरातून बाहेर जाण्यासाठी तनीषा मुखर्जी, गौहर खान, एजाज खान आणि काम्या पंजाबी यांना नॉमिनेट करण्यात आले होते.