लग्नाचा विचार नाही – कैटरिना

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लव्ह अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याबाबत अभिनेत्री कैटरिनाने मात्र या चर्चांना तोडत ‘मी सिंगल आहे आणि सध्या तरी माझा लग्न करण्याचा काही एक विचार नाही’ असे सांगत आहे. तरीपण आगामी काळात कैटरिना कधी लग्न करणार यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

मध्यंतरी स्पेनमध्ये सुट्टीदरम्यान रणबीर कपूरसोबत बिकनीमधले फोटो मीडियात पाहून कॅट चांगलीच लालेलाल झाली होती. आपल्या सुट्टीतील दिवसांना खाजगी क्षण सांगून आपल्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचा सल्लाही तीनं मीडियाला दिला होता. यावेळी पुढे बोलताना कैटरिना म्हणाली, ‘प्रत्येक जण एकटा अथवा विवाहित आहे… मी माझ्या मागे लागणा-यांची पर्वा करत नाही… सेलिब्रिटींनाही सर्वांप्रमाणे एक वेगळे व्यक्तीमत्व आहे. लग्न होइपर्यंत मी एकटीच आहे, हे माझं वाक्य आहे आणि आता प्रत्येक जण या वाक्याचा वापर करत आहे. यावर माझा कॉपीराईट असायला हवा… पण, लग्न करण्याबाबत मी काही ठरवले नाही’.

यावेळी, रणबीर कपूर सोबत आपल्या साखर पुड्याबाबत विचारल्या जाणा-या प्रश्नांना मात्र तिने कानामागे टाकले. कॅटचा एकेकाळचा चांगला मित्र सलमान खान आणि आता रणबीर कपूर यांच्यापैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे? असा प्रश्न जेव्हा तिला विचारला गेला तेव्हा मात्र ‘मी एक दीर्घ आणि शांतीपूर्ण आयुष्य पसंत करीन’ असे उत्तर कॅटनं दिले आहे.

Leave a Comment