भांडण नेत्यांचे, कोंडी कार्यकर्त्यांची

आपल्या देशातल्या राजकारणाला गटबाजी, चमचेगिरी, व्यक्तीपूजा आणि अभिनिवेश या चार रोगांनी ग्रासलेले आहे. यातच पुन्हा देशाचे राजकारणातले संदर्भ आणि समिकरणे अशी सतत बदलत राहतात की कार्यकर्त्यांना नेमके काय करावे कळत नाही. बदलत्या समीकरणानुसार नेत्यांचे संबंध सुधारतात आणि बिघडतात. परंतु कार्यकर्ते मात्र पटकन समीकरण बदलू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात रामदास आठवले यांच्या रिपाइंचे कार्यकर्ते गेल्या २५ वर्षांपासून भाजपा-शिवसेना हा आपला शत्रू क्रमांक १ असल्याचे मानत होते. त्यानुसार टीकाटिप्पणी करण्याच्या बाबतीत या युतीला ते सतत लक्ष्य करत असत. परंतु रामदास आठवले यांना एक दिवस असा साक्षात्कार झाला की शरद पवार यांच्या नादी लागून आपले कल्याण होणार नाही. मग त्यांनी २५ वर्ष ज्यांना शिव्या दिल्या त्या भाजपा-सेना युतीच्या गळ्यात गळे घातले. आठवले-ठाकरे-मुंडे यांना गळ्यात गळे घालताना काही वाटले नाही पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी आजवर परस्परांशी कट्टर शत्रू असल्यागत व्यवहार केला होता. त्या कार्यकर्त्यांना तेवढ्या सहजतेने गळ्यात गळे घालता आले नाहीत. कारण शत्रुत्वाच्या काळात परस्परांचे मानसिक आणि राजकीय दृष्ट्या खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केलेले होते. पोलिसात एकमेकांच्या विरुध्द ङ्गिर्यादी दाखल केल्या होत्या.

तालुक्यात आणि जिल्ह्यात कार्यकर्त्यांची नेहमीच अशी गोची होती. एक गट भाऊसाहेबांचा, दुसरा गट रावसाहेबांचा. भाऊसाहेब आणि रावसाहेब जसे भांडायला लागतात तसे गावागावातले त्यांच्या गटातले लोक परस्परांच्या गळे पकडायला लागतात. या कार्यकर्त्यांचे भांडण काही वेळा इतक्या विकोपाला जाते की दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना भान रहात नाही आणि ते जन्मभराचे वैरी होऊन बसतात. नेते एक झाले तरी कार्यकर्ते एक होऊ शकत नाहीत आणि आपण काय करून बसलो हे त्यांच्या उशिरा लक्षात येते. बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंंडे यांचे भांडण एवढ्या टोकाला पोहोचले आहे की त्यांच्या गटाचे कार्यकर्तेसुध्दा परस्परांकडे सरळ बघायला तयार नाहीत. त्यांचे कार्यकर्ते तर भांडत आहेतच पण दोघांच्या गटाचे पत्रकारसुध्दा त्यांच्या भांडणात पडलेले आहेत. या कार्यकर्त्यांना याचे भान नसते की राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. ही गोष्ट शरद पवारांना लागू आहे. ते कोणाचेही शत्रू होऊ शकतात आणि कोणत्याही क्षणी कोणाचे मित्रही होऊ शकतात. तेव्हा पवार आणि मुंडे हे कधी एकत्र येतील हे सांगता येत नाही.

पवार आणि मुंडे यांचे भांडण विकोपाला जावे अशा काही घटना घडल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याला अजित पवार यांनी भाजपातून ङ्गोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणले आहे. मुंडे हे पाडापाडीचे आणि ङ्गोडङ्गोडीचे राजकारण करण्यात ङ्गार वाकब्गार आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांना ङ्गोडून भाजपामध्ये आणले होते. कॉंग्रेसमध्ये ङ्गोडाङ्गोड करतो तेव्हा मुंडेंना आनंद होतो पण त्यांच्या पक्षात कोणी ङ्गोडाङ्गोड केली तर त्यांना आवडत नाही. त्यांच्या या स्वभावाचा सध्या प्रत्यय येत आहे. मुळात १९९५ पासून गोपीनाथराव मुंडे हे पवारविरोधी नेते म्हणून ओळखले जातातच. त्यातच आता पवारांनी गोपीनाथरावांच्या पुतण्याला ङ्गोडून राष्ट्रवादीमध्ये आणले आहे. या कामात अजित पवार यांनी पुढाकार घेतलाय. मुळात अजित पवार आणि गोपीनाथराव मुंडे यांच्यात सख्य नव्हतेच. त्यातच आता अजित पवार आणि गोपीनाथरावांचे घर ङ्गोडले. त्यामुळे मुंडे भलतेच चिडले आहेत आणि त्यातून अजित पवार आणि गोपीनाथराव यांच्यात एवढी शाब्दिक चकमक जारी झाली आहे की लोकांना ती नकोशी वाटायला लागली आहे. या दोघांतल्या या कटुतेच्या वातावरणातच बीड िजल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रकरण समोर आले आणि अजित पवारांनी गोपीनाथ मुंडेंची बोलती बंद करण्यासाठी या बँकेतल्या भ्रष्टाचारावर खटले दाखल करण्याचा आदेश त्या बँकेच्या प्रशासकाला दिला.

एकदा एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतवून टाकले की मुंडे ङ्गारशी हालचाल करणार नाहीत असा अजित पवार यांचा कयास होता. पण अजित पवार जेवढे आक्रमक आहेत. तेवढेच अविचारी आणि अपरिपक्व आहेत. त्यातच त्यांचे सल्लागार चांगले नाहीत. त्यामुळे बीड जिल्ह्यातली ही भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढताना त्यांना या जिल्ह्याच्या गुंतागुंतीचे राजकारण लक्षात आले नाही. बीड जिल्ह्यामध्ये भाजपा आणि कॉंग्रेस तसेच विविध गटतट यांच्यात एवढे पक्षांतर आणि ङ्गोडाङ्गोडी होते की कोणता नेता कधी कोणत्या पक्षात होता हे नक्की सांगता येत नाही. बीड जिल्हा बँक प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले संचालक त्या पदावर असताना भाजपामध्ये होते पण आता राष्ट्रवादीत आहेत. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची गठडी वळवण्यासाठी अजित पवारांनी टाकलेल्या ङ्गासात राष्ट्रवादीचेच नेते अडकले आहेत आणि आता सर्वांचीची पंचाईत होऊन बसली आहे. अजित पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या भांडणात कार्यकर्ते आणि खालच्या पातळीवरचे नेते अडचणीत येत चालले आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांना एक सल्ला द्यावासा वाटतो की मोठ्या नेत्यांना भांडायचे तर भांडू द्या पण त्या भांडणात आपला जीव उगाच गमावून बसू नका.

Leave a Comment