सांगलीत मामानीच केला भाचीवर बलात्कार

सांगली – मामा- भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सांगलीमध्ये घडली आहे. चुलत मामानेच भाचीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केलाच पण, त्यानंतर तिची हत्या करून तिला शेतात पुरून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

वैष्णवी शिरसाट असे या मृत बालिकेचे नाव आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील ही धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेत नराधम मामाने सात वर्षीय भाचीचे अपहरण केले होते. या मामाने अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन निर्दयीरित्या खून केला.

या सर्व प्रकारानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या मामाने मयत बालिकेचा मृतदेह शेतात पुरून टाकला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात लहान मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलानी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेता असता अपहरण करून बालिकेचा खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Leave a Comment