मोदी बरोबर काम करण्यास अडचण नाही- अमेरिका

वॉशिंग्टन – भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सरकार बनलेच तर मोदींबरोबर काम तयार असल्याचे ओबामा प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. भारतातील सार्वत्रिक निवडुकांच्या निकालानंतर सध्या भारत आणि अमेरिकेत असलेले परस्पर संबंध दुरावण्याचे कांही कारण नाही कारण भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे आणि भारताबरोबर काम करण्यास अमेरिका नेहमीच तयार असल्याचेही हे अधिकारी म्हणाले.

गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारला गेल्याच्या बातम्यात तथ्य नसल्याचे सांगून हे आधिकारी म्हणाले की मोदींचा व्हिसा हा मोठा इश्यू नाहीच. भारतीय प्रसारमाध्यमांनी निष्कारणच हा मोठा इश्यू बनविला आहे. अमेरिकन सरकारकडे मोदी यांनी व्हिसा साठी अर्जच केलेला नाही मात्र तसा अर्ज ते करू शकतात. त्यावर नियमांप्रमाणे निर्णय घेतला जाईल.

सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारबरोबर अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. आगामी निवडणुकात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले अथवा अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांनी सरकार बनविले तरी आमची त्याला मान्यता असेल आणि अमेरिका भारत यांच्यातील नातेसंबंध पूर्वीप्रमाणेच राहतील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment