कैटरिना-ऐश्वर्यामध्ये आता मैत्री

बच्चन कुटंबाच्यावतीने दीवाळीनिमित्तत आयोजीत केलेल्याज पार्टीमध्ये अभिनेत्री कैटरीना कैफ सहभागी झाली होती. अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉयने त्यांच्या‍ घरीच दीवाळीनिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या दीवाळी पाटीमध्ये बॉलीवुडमधील दिग़गज मंडळी सहभागी झाले होते. यासाठी बॉलीवूडमधील नामवंत मंउळीना इनवाइट करण्यात आले होते. विशेष म्हणजे या पार्टीत अभिनेत्री कैटरीना कैफ सहभागी झाल्याने सर्वांचे लक्ष तिच्याकडेच होते.

या पार्टीसाठी कैटरीना कैफ सोबतच अभिनेता रणबीर कपूरला देखील आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्ह्णनजे सलमान खानच्या‍ दोन एक्स गर्लफ्रैंड एक सोबत पार्टीत असल्याने सर्वांसाठी तोच चर्चेचा विषय होता. यापूर्वी कधीच अभिनेत्री कैटरीना कैफ आणि ऐश्वर्या रॉय एका जागी दिसल्या नव्हत्या. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या राय-बच्चननेच कैटीरना कैफला पार्टीचे आमंत्रण दिले होते.

‘धूम-३’ च्या शूटिंग सेटवर ऐश आणि कैट यांच्यात मैत्री झाली आहे. अभिषेक बच्चन धूम सीरीजच्या सिनेमात सारखाच काम करीत आला आहे. यावेळेस ‘धूम-३’ मध्ये पहिल्यांदाच कैटरीना कैफ सहभागी झाल आहे. ऐश ज्यावेळी अभिषेक सोबत सेटवर येत होती. त्यावेळी तिची कैटरीनासोबत भेट होत होती. काही दिवसांपूर्वी कैटरीना कैफ – ऐश्वर्या मध्ये जो कोल्ड वॉर सुरू होते. ते या निमित्ताने मिटले असून आता दोघीमध्ये चांगली मैत्री झाली आहे.

Leave a Comment