सचिनच्या अंतिम कसोटी परफॉर्मन्सवर २ हजार कोटींचा सट्टा

मुंबई – सचिन त्याची निवृत्तीपूर्वीची अंतिम २०० वी कसेाटी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या या कसोटीत सचिनची कामगिरी काय असेल यावर बेटींग सुरू झाले असून हा सट्टा दोन हजार कोटींच्या घरात असल्याचे समजते. बुकींना यापूर्वी बेटींग घेण्यात इतकी घाई केल्याची घटना प्रथमच घडते आहे असेही सांगितले जात आहे.

कोणत्याही गोष्टीचे बेटींग घेताना बुकी आणि बेटींग घेणारे बराच अभ्यास करत असतात. मात्र यावेळी तेंडुलकरच्या निवृत्तीचा जो गाजावाजा सुरू आहे तो पाहता हे बेटींग आकडेमोडीवर नाही तर भावनिक आधारावर घेतले जात आहे असे समजते. केवळ मुंबईच नव्हे तर इंदोर, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, कोलकाता या भारतातील शहरातून तर दुबई आणि लंडन या परदेशी शहरातूनही सट्टा खेळला जात आहे. ऑन लाईन वरूनही प्रंचड प्रमाणात बेटींग सुरू असून सध्या ते फक्त सचिन सेंच्युरी करणार का यावरच लावले जात आहे व त्याचा दर आहे ९० पैसे.

मात्र रविवारपासून सचिन मॅन ऑफ द मॅच बनणार का, एलबीडब्ल्यू होणार का, शून्यावर आऊट होणार का, ५० पेक्षा कमी धावा, ५० पेक्षा जास्त धावा, दोन्ही इनिगमध्ये २५ रन्स अशा अनेक बाबींवर बेटींग सुरू होत आहे. बुकी किंग अशी ओळख असलेला शोभन मेहता सचिनच्या परफॉर्मन्सवर बारीक नजर ठेवून असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment