सैफच्या मुलाची करीनाशी मैत्री

अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खान यांच्याा विवाहाला आता एक वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अभिनेता सैफ अली खानच्या पूर्वीच्याे दोन्ही मुलाशी करीनाचे सूत चांगले जमले आहे. सारा आणि इब्राहिम यांच्याशी आपले खूप चांगले संबंध असल्याचे स्वतः करिनाने कबूल केले आहे. त्या दोघांची मी एक चांगली मैत्रीण असल्याचेही करीनाने यावेळी बोलताना स्पष्टन केले.

करिना आणि सैफ यांनी २०१२ साली लग्न केले. त्यापूर्वी, अमृता सिंह या त्याच्या पहिल्या बायकोपासून सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. यावेळी बोलताना अभिनेत्री करीना म्हणाली, ‘या दोन्ही दोघांशी आपले संबंध तसेच आहेत. मुलाशी ज्याप्रमाणे संबध असायला हवेत त्याोप्रमाणे त्यांच्याशी संबध आहेत. दोन्ही मुले व माझ्यात जवळीकता आहे. त्यामुळेच आम्ही चांगले मित्रमैत्रीण आहोत.’

सैफ-करिनाच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. सैफ एक अद्भूत अभिनेता आहे आणि चांगल्या व निवडक सिनेमाच्या निवडीकरता तो ओळखला जातो. त्याने कधीच स्वतःला सुरक्षित ठेवून सिनेमाची निवड न करता वेगवेगळ्या भूमिका करण्यावर लक्ष्य दिले आहे. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे मी त्याच्यावर भाळले आहे, असे करिना म्हणाली.

Leave a Comment