दीपिका-रणवीर पुन्हा एकत्र

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुडमध्ये डिंपल गर्ल अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आगामी काळात पुन्हा एकदा रणवीर सिंह सोबत सिनेमात काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दीपिका पादुकोणने रणवीर सिंह सोबत रामलीला या सिनेमात काम केले आहे.

याबाबत बोलताना दीपिका म्हणाली, ‘आगामी काळात येत असलेला रामलीला या सिनेमाचा प्रोमो पाहूनच मी आणि रणवीरच्या जोडीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रोमो पाहून जर चांगली प्रतिक्रिया व्यक्त होत असेल तर आगामी काळात आमचा सिनेमा पाहून आमच्यात बाबतीत चांगलीच प्रतिक्रिया व्यक्त करतील. रामलीला हा सिनेमा पाहिल्या नंतर आमचा सिनेमा काही जणांना सारखा पाहवा असा वाटणार आहे. त्यामुळे मी आगामी काळात पुन्हा एकदा रणवीर सोबत सिनेमात काम करणार आहे.’

दीपिका पादुकोण व रणवीर सिंह या जोडीचा आगामी काळात येत असलेला रामलीला हा सिनेमा शेक्सपियरच्या नाटकातील रोमियो आणि जूलियट यांच्याा जोडीवर आधारित आहे. संजय लीला भंसाली यांच्या सिनेमात दीपिका पादुकोण आणि रणबीर सिंह यांच्या शिवाय ऋचा चड्डा ही मुख्य भूमिका करीत आहे. रामलीला हा सिनेमा १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment