सचिनला बाद ठरवण्याचा पंचाचा निर्णय वादग्रस्त

कोलकाता – कोलकाता येथे सुरु असलेल्या विंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याजमुळे सचिनच्याय चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. यावेळी सचिनला बाद ठरवण्याचा पंचाचा निर्णय वादग्रस्त असल्याचे आता समोर आले आहे. पंचांच्या या निर्णयाविरोधात खुद्द सचिननेही नाराजी व्यक्त केली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्याा १९९व्या कसोटीत फलंदाजी करण्यास ईडन गार्डनवर उतरला आणि संपूर्ण मैदान त्याच्या नावाच्या घोषणांनी दुमदुमुन गेले. आपल्या आवडत्या खेळाडूचा बहारदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी सचिनचे चाहते सरसावून बसले खरे पण तो अवघ्या १० धावांवर खेळत असताना शिलिंग फोर्डने त्याला पायचित केले. पंचांनीही तो बाद असल्याचा निर्णय दिला. मात्र त्यानंतर हॉक आय प्रणालीच्या आधारे बघितले असता मात्र तो चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे स्पष्ट झाले.

पंचांच्या चुकीच्या निर्णयाने सचिनची विकेट घेतली. या निर्णयामुळे चाहतेही निराश झाले होते. पंचांनी दिलेल्या निर्णयावर सचिनचाही विश्वास बसला नाही. एरवी बाद झाल्यावर सरळ चालू लागणा-या सचिनने यावेळी मात्र पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर अंपायरच्या निर्णयावर नाराजी दर्शवली.

Leave a Comment