महिलांना संमोहित करुन लुटणा-या भोंदूबाबाला अटक

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून महिलांना संमोहित करुन लुटणा-या मुंबईतल्या वडाळा परिसरातील एका भोंदू साधूचा पर्दाफाश करण्यात आला आहे. साधूकडे येणा-या महिलांना संमोहित करुन त्यांच्या गळ्यातल्या दागिने घेऊन हा साधू फरार होत होता. राजू चौगुले असे या भोंदू साधूचे नाव आहे. नोलिसांनी त्याऊला अटक केली आहे.

साधूच्या वेशात हा भोंदू बाबा दीक्षा जाधव या महिलेच्या घरी आला. बाहेरची बाधा झाल्याने सुख मिळत नसल्याचे सांगत त्याने महिलेला भूलवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यापासून मुक्ती पाहिजे असल्यास गळ्यातली सोनसाखळी देवाजवळ ठेवा असे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून दीक्षा जाधव यांनीही सोनसाखळी काढून ठेवली. त्यानंतर संमोहनाच्याआधारे त्यांना बेशुद्ध केले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर अचानक शुद्धीवर आलेल्या दीक्षा जाधव यांनी आरडाओरडा करत पळण्याच्या घाईत असलेल्या या भोंदू साधूची पोलखोल केली. पोलिसांनी या भोंदू साधूला अटक केली आहे. तो नगर जिल्ह्यातला असून पनवेलच्या झोपडपट्टीत राहत असल्याचे समोर आले आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा कसून चौकशी करीत असून यामागे कोणती टोळी आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Comment