बोधगयातील बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात एनआयए यशस्वी

पाटणा- एनआयएला बोधगया येथे जुलै महिन्यात झालेल्या दहा साखळी बॉम्बस्फोटांचा तपास लावण्यात यश आले आहे. या स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीनच्या रांची मॉडेलचा हात असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. बिहारमधील बोधगया येथे ७ जुलैला १० साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेच्या् तपासाचे काम पूर्ण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्या पाटण्याततील सभेआधीच २७ ऑक्टोबरला गांधी मैदानात स्फोट झाले होते. पाटणा येथे झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा तपासही एनआयए संघनेकडून सुरू आहे. लवकरच या घटनेचा छडा लवकरच लावण्याात येणार असल्यााचे समजते.

या स्फोटांच्या तपासादरम्यन एनआयएने रांचीतून काही जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी बोधगया बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या सोमवारी रांचीतून आणखी दहा जिवंत बॉम्ब आणि काही स्फोटके एनआयएने जप्त केली होती. एका विद्यार्थ्यांच्या लॉजमधील एका खोलीत हे बॉम्ब सापडले होते. ज्या विद्यार्थ्याच्या खोलीत बॉम्ब सापडले तो फरार आहे.