मनोहर जोशी यांची सेनेकडून अजूनही कोंडी

मुंबई- शिवसेनेचे वादग्रस्त नेते खासदार मनोहर जोशी यांची कोंडी करण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. गेल्या् काही दिवसांपासून जोशी सरांना शिवसेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी करायचे नाही, त्यांना त्यात सहभागी करून घ्यायचे नाही, असे आदेशच असल्याचे समजते. त्यामुळे माटुंग्यातील श्रद्धानंद आश्रमात नियोजित तारखेपूर्वीच तो दिवाळीभेटीचा कार्यक्रम आटोपून घेण्यात आल्याचे समजते.

दोनच दिवसांपूवी झालेल्याे या कार्यक्रमामुळे मनोहर जोशी यांना धक्काच बसला. एवढेच नव्हे, तर सरांची सावली मातोश्रीवर पडून त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होऊ न नये, म्हणून रविवारी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या जोशींना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्यासाठी नेते कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर गर्दीचेकडे केल्याचे शिवसेनेच्या गोटातूनच सांगण्यात आले. दरवर्षी माटुंग्यातील श्रद्धानंद आश्रमातील महिलांकडून ओवाळणी करून घेण्यासाठी भाऊबीजेसाठी शिवसेनानेते खासदार मनोहर जोशी हे शिवसैनिकांसह त्याहठिकाणी जात होते. गेल्या काही वर्षापासूनची ही परंपरा आहे. परंतु यंदा मात्र ही परंपरा खंडित झाली आहे.

यंदा श्रद्धानंद आश्रमातील महिलांना भाऊबीजेची भेट मिळाली खरी. पण ती सरांच्याहस्ते न मिळता शिवसेना विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्याहस्ते झाली आहे.मनोहर जोशी यांच्यासोबत या आश्रमात जावे लागेल, या भीतीमुळे दादरमधील शिवसैनिकांनी दोनच दिवस आधी जावून येथील महिलांना दिवाळी भेटवस्तू दिल्या. जेव्हा सरांनी, याबाबत दादरमधील शिवसैनिकांकडे विचारणा केली, तेव्हा तो कार्यक्रम कालच झाला असे सांगण्यात आले. त्यामुळे मनोहर जोशींना धक्काच बसला.

Leave a Comment