मुंबईत अल्पवयीन मुलीवर पुन्हा सामूहिक बलात्कार

मुंबई – मुंबईत दोन महिन्यांपूवीं एक पत्रकार तरुणीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच काल गोरेगाव परिसरात १६ वर्षांच्या मुलीवर चौघा तरुणांनी बलात्कार केल्याचे प्रकरण उघड ्रझाले आहे. गेल्या एक तारखेला झालेल्या या सामूहिक बलात्काराचे प्रकरण काल उघड झाले. बलात्कार करणारे तरुण पीडित मुलीच्या परिचयाचे असून त्यांचे नावे निष्पन्न झाली आहेत पण त्यांनी आता पलायन केल्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

या तरुणीला या नराधमांनी दिवाळीच्या पुजेनिमित्त संध्या काळी पाचारण केले होते. ते तरुण ओळखीचे असल्याने ती त्यांच्या आमंत्रणावरून पूजेला गेली. शुक्रवारी पूजा आटोपली. तिला घरी सोडण्यासाठी हे तरुण तिला घेऊन निघाले पण त्यांनी तिला तिच्या घरी पोचवण्याऐवजी रस्त्यात एका निर्जन स्थळी नेले आणि पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment