अय्यर म्हणतात, मुस्लिमच ठरवतात भारताचा नेता!

दुबई – भारतात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांना खूष करणारे वक्तव्य काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी दुबईमध्ये केले. पंतप्रधान कोण होणार हे भारतामध्ये अल्पसंख्यांक मतदार ठरवतात. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष अल्पसंख्यांकांना खूष करण्यासाठी विविध उपक्रम राबवतात असे अय्यर म्हणाले.

अनेकदा अल्पसंख्याक समाजाकडून एकगठ्ठा मतदान होते. विशिष्ट पक्षाच्या उमेदवारांनाच सरसकट पाठिंबा दिला जातो. याची जाणीव असल्यामुळे भारतातील राजकीय पक्ष अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यावर भर देतात. निवडणूक काळात ही खूषमस्करी एकदम वाढते, अशा स्वरुपाचे वक्तव्य मणीशंकर अय्यर यांनी दुबईमध्ये केले.

देशाच्या परराष्ट्र खात्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या मणीशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकून काही वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून महत्त्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या आहेत. त्यामुळे अय्यर यांनी दुबईत केलेल्या वक्तव्याला खूप महत्त्व असल्याचे राजकीय वर्तुळातील तज्ज्ञांनी सांगितले.

Leave a Comment