शाहरूख-सलमान करणार एकत्र काम

आगामी काळात सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान एकत्रित काम करणार आहेत. याबाबत बोलताना शाहरुख खान म्हणाला की, जर त्याला आगामी काळात संधी मिळाली सलमान सोबत काम करण्याची शक्यता आहे. शाहरुख आणि सलमानने १९९५ साली करण-अर्जुन मध्ये एकत्रित काम केले होते. त्यानतर ‘हम तुम्हारे हैं सनम’ मध्ये त्यांनी एकत्रित काम केले आहे. २००८ मध्ये कैटरीना कैफच्या‍ बर्थडे पार्टीमध्ये वाद झाला होता.

वाढदिनाच्या दिवशी शाहरूखने ए‍कत्रित काम करण्यािचा संकल्प केला आहे. बॉलिवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानने ४८ व्या वर्षात पदापर्ण केले आहे. शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. शाहरुखने मन्नतच्या बाहेर आला आणि चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

मन्नतच्या बाहेर शाहरूख खानच्याा चाहत्यांची सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या चेन्नई एक्सप्रेसन बॉक्स ऑफिसवर धूम केल्यामुळे शाहरुखच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Leave a Comment