रणवीर, परिणीताने घेतली नाही दिवाळीची सुटी

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर आगामी काळात येत असलेल्या ‘रामलीला’ या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे या काळात त्याच्या सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण असल्याने तो सध्या त्याच्या कामावर खूपच खूष आहे. संजय लीला भंसाळीचा रामलीला हा सिनेमा १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. त्यामुळेच रणवीर आणि परिणीती चोप्राने दिवाळीची सुटी घेतली नाही.

याबाबत बोलताना रणवीर म्हणाला, आगामी दीपावलीच्या सुटीमध्ये ‘रामलीला’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त असल्याने मी सुटी घेतली नाही. तर दुसरीकडे परिणीति चोप्रा आगामी काळात येत असलेल्या. यशराज फिल्म्सच्याा ‘दावत-ए-इश्क’ या सिनेमाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. परिणीति म्हणाली, दिवाळीची सुटी घेण्या ऐवजी सेटवरील काम संपविण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे सुटी घेतली नाही. या सिनेमाचे शूटिंग संपले तर मला सुटीच मिळेल.

‘दावत-ए-इश्क’ या सिनेमाच्या टीम सोबतच परिणीता दिवाळी साजरी करणार आहे. परिणीतिला कुटूंबासोबत सण साजरा करण्याची इच्‍छा आहे. परिवारासोबत फटाक्याची अतिशबाजी करायला आवडते. तर याबाबत बोलताना अभिनेता रणवीर म्हणाला, ‘दिवाळीचया दिवशी आजीच्या घरी सर्व कुंटूबाला जेवणासाठी जावे लागते. त्यानिमित्ताने वर्षातून एकदा सर्वपरिवार एकत्रित येतो.’

Leave a Comment