आसामात गोळीबारात सहा ठार

गोलापारा – आसामच्या गोलपारा जिल्ह्यातल्या एका गावातल्या भर बाजारात दिवाळीच्या निमित्ताने जुगार खेळत बसलेल्या लोकांवर काही अतिरेक्यांनी बेधुंद गोळीबार केल्याने सात जण ठार तर अनेक लोक जखमी झाले. रविवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला. ही घटना घडलेले ठिकाण आगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्या गावाचे नाव गेंडामारी असे आहे. हल्ला करणारे अतिरेकी गारो नॅशनल लिबरेशन ङ्ग्रंट या संघटनेचे असून ते हातात अनेक प्रकारचे शस्त्रे घेऊन आले होते.

या अतिरेक्यांनी या सुदूर गावाच्या बाजारात ङ्गार मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला कारण त्यांच्याकडे स्वयंचलित रायङ्गली होत्या. मरण पावलेले सात जण गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन जागीच मरण पावले. ते सर्व जण राभा या समाजातले होते. या ठिकाणी जखमी झालेल्या लोकांना गावकर्‍यांनी गोलपारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाले.

गोलपारा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक विकास यंत्रणेच्या निवडणुकीवरून वाद चालला आहे. या यंत्रणेच्या निवडणुका येत्या १३ ते २५ तारखेच्या दरम्यान होणार आहेत. राभा समाजाची मोठी वस्ती असलेला भाग या यंत्रणेतून वगळावा अशी गैर राभा समाजाची मागणी आहे मात्र या घटनेचा या मागणीशी काही संबंध नाही असा खुलासा सरकारने केला आहे. मेघालयातले हे अतिरेकी आसामला लगत असलेल्या मेघालयातल्या जंगलात राहतात आणि आसामात येऊन असे प्रकार करतात. असे २००९ सालीही घडले होते.

Leave a Comment