माणसाला चावल्यानंतर कुत्र्याचाच मृत्यू

मुंबई – बातमी कोणती होते त्याची उदाहरण देणारे नेहमीच कुत्रा माणसाला चावला तर बातमी नाही मात्र माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, असे सांगतात. तसेच कुत्रा माणसाला चावल्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र माणसाला चावल्यानंतर कुत्राच मेल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. जर्मन शेफर्ड जातीचा हा कुत्रा होता. परेल येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील या जर्मन शेफर्ड कुत्र्याने याच रुग्णालयात काम करणार्‍या प्रदीप महाडीक(वय – 24 वर्षे) यांना चावा घेतला. चावा घेतल्यानंतर अवघ्या दहाच मिनीटांत हा कुत्रा मेला. प्रदीप महाडीक यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांना 15 हजार रुपये किंमतीची अँटी रेबीज लस देण्यात आली आहे. कुत्रा मेल्यामुळे महाडीक यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कुत्रा कशामुळे हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या घटनेमुळे भयभीत झालेल्या रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी प्राण्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तसेच महाडीक यांच्या उपचाराचा खर्च या कुत्र्याच्या मालकाने द्यावा अशी मागणी ही हे कर्मचारी करत आहेत.

Leave a Comment