लाहोर: ज्येष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचे रविवरी निधन झाले. रेश्मा या घशाच्या कर्करोगामुळे त्रस्त झाल्यात होत्या. गेल्या महिनाभरापासून त्या कोमात होत्या. लाहोरमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रेश्मा यांनी हिरो सिनेमातील ‘लंबी जुदाई’ हे लोकप्रिय गाणे गायले आहे.
राजस्थानातील बिकानेर येथे रेश्मा यांचा जन्म १९४७ साली झाला. फाळणीवेळी त्यांचं कुटुंब कराचीला स्थायिक झाले. रेश्मा यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून गाण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक लोकगीते गाऊन पाकिस्तानीच नाही, तर भारतीय चाहत्यांची मने जिंकली.
रेश्मा यांनी १९६० नंतर भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये गायिकेची छाप उमटवायला सुरुवात केली. त्यांनी दमादम मस्त कलंदर, हायो रब्बा नही लगता दिल मेरा, लंबी जुदाई यासारखी गाणी गाऊन चाहत्यांची मने जिंकली.