रोहित शर्माचे तीन विक्रम

शनिवारच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माच्या फटकेबाजीचा दणदणाट दुमदुमला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याा सामन्यात १६ षटकारांसह २०९ धावा काढून रोहितने तीन विश्वविक्रमांची आतषबाजी केली. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४५ धावांनी विजय मिळवत मालिकाही जिंकली.

वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा रोहित तिसराच खेळाडू आहे. तर त्यावने शेन वॉटसनचा १५ षटकाराचा विक्रम मोडला आहे. त्याशिवाय त्याने व्याक्ती‍गत सर्वाधिक धावा केल्याा आहेत. त्या्ने सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांच्याि द्विशतक ठोकण्याच्याय विक्रमाची बरोबरी केली आहे. मालिकेत एकूण ४९१ धावा चोपणारा रोहित सामनावीर व मालिकावीर ठरला.

बंगळुरूत क्रिकेट जगतातील या ‘क्रिश३’ने मैदान मारले. रोहित शर्मा क्रिकेटचा तिसरा सुपरमॅन ठरला. चौकार, षटकारांच्या आतषबाजीत प्रेक्षकांचीही दिवाळी झाली. भारताने उभ्या केलेल्या धावांच्या डोंगरापुढे कांगारूंनीही शर्थीची झुंज दिली. जेम्स फ्युकनरने ७३ चेंडूंत सहा षटकार व ११ चौकारांनिशी ११६ धावा करत शेवटपर्यंत किल्ला लढवला. मॅक्सवेलनेही २२ चेंडूंत ७ षटकारांसह ६० धावांची तुफानी खेळी केली. शमी व जडेजाने प्रत्येकी तीन बळी टिपले.

.

Leave a Comment