हिट सिनेमासाठी प्रमोशनची गरज-करीना

काळ बदलत आहे त्याअप्रमाणे सिनेमाचे शेडयूल देखील बदलत आहे. बॉलीवुडची प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूरच्याु मते, सिनेमा यशस्वीा होण्यालसाठी प्रमोशन करण्याची गरज आहे. प्रमोशन केल्या नंतरच हा सिनेमा हिट होतो हा अनुभव आहे. त्यायमुळे मी प्रत्येक सिनेमाचे प्रमोशन धुमधडाक्या‍त करत असते.

याबाबत पुढे बोलताना अभिनेत्री करीना कपूर महणाली, ‘आज कालची सिनेमे हे केवळ चांगल्या मार्केटिंगमुळे चालत असतात. आता कलाकारांने सिनेमात फक्त‍ काम करणे मर्यादित राहिले नाही तर सिनेमाचे प्रमोशन करण्याची भूमिका देखील आता करावी लागत आहे. आता कुठलाच सिनेमा हा डायमंड जुबली अथवा सिल्वर जुबली होत नाही.’

सध्याच्या काळात वीकेंडपर्यंत सिनेमा चालला तरी सिनेमा चांगली कमाई करतो. हा सिनेमा यश्स्वी देखील मानला जातो. चांगली कमाई केली तरच सिनेमा यशस्वी मानला जातो. त्यामुळे सिनेमाचे प्रमोशन महत्वपूर्ण मानले जाते. पूर्वीच्या काळात आम्ही देखील सिनेमात काम करीत होतो व गुपचूप बसत होतो. करीना सध्या ‘गोरी तेरे प्यार में’ या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.

Leave a Comment