ड्रोन हल्ल्यात तालिबानचा प्रमुख मेहसूद ठार

पेशावर : उत्तर वजिरिस्तानच्या आदिवासी भागात अमेरिकेच्या सेनेने शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख हकिमुल्ला मेहसूद ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात त्याच्यासोबत अन्य सहा तालिबानी मारले गेले.

सीआयएद्वारा संचालित हेर विमानाने उत्तर वजिरिस्तानच्या दंडय दार्पाखेल भागातील एका कम्पाऊंडवर जोरदार हल्ले केले. यात प्रतिबंधित तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख मेहसूद ठार झाला, अशी माहिती ‘डॉन’ या दैनिकाने गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने दिली. या हल्लयात मेहसूद सोबत अन्य, सहा अतिरेकी ठार झाली असल्यारची माहिती गुप्तचर सूत्रांने दिली आहे.

या ह‍ल्ल़ययात तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख हकिमुल्ला मेहसूद ठार झाल्याचे वृत्त असले तरी या बातमीला अधिकत दुजोरा मिळू न शकल्यामुळे या ड्रोन हल्लयात मरण पावलेल्या अतिरेक्यात मेहसूदचा समावेश आहे की नाही हे निश्चीत समजू शकले नाही. याबाबतची अधिकत घोषणेला वेळ लागेल अशी माहिती सुत्रांनी दिली.

Leave a Comment