आर. आर. पाटील यांचे मुंडेकडून अभिनंदन

मुंबई : गडचिरोली जिल्हटयातील आदिवासींच्या वीज प्रश्नावर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्याशी वाद घालण्याची हिंमत दाखविली म्हणून आपले अभिनंदन, असा फोन भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केला. त्या्ची माहिती शुक्रवारी मुंडे यांनी प्रसारमाध्यधमांना दिली.

या प्रकाराबाबत स्वत: मुंडे यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पाटील पोटतिडकीने आदिवासींचे प्रश्न मांडत असताना त्यांची चेष्टा अजित पवार यांनी केली.’ स्वाभिमानी पाटील यांनी या चेष्टेच्या निषेधार्थ राजीनामा द्यावा. आगामी काळात दिवाळी होईपर्यंत शेतकरी, आदिवासींची वीज कापू नये, अशी मागणी मुंडे यांनी केली.

नवी दिल्लीत झालेल्या तिसर्याा आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित राहणे हा दबावतंत्राचा भाग आहे. महाराष्ट्रात आघाडीमध्ये २२ जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हा दबाव असल्याचे मुंडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment