आमीर खानचे दिवाळी गिफ्ट

दिवाळी आधीच आमीर खानने प्रेक्षकांना गिफ्ट दिले आहे. आमीर खानचा यशराज बॅनरसोबत येणारा धूम 3 या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी अभिनेता अभिषेक बच्चन आणि दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्यही उपस्थित होते. सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमा अधिक रोमांचक आणि प्रेक्षकांच्या पसंतीला पडेल असे वाटत आहे. त्यामुळे अमिरचा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी गिफ्टच असणार आहे.

दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्यचा सिनेमा धूम थ्री हा धूम सिनेमाचा सीक्वेल आहे. आमीर खानशिवाय अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आणि कटरिना कैफही काम करीत आहेत. हा सिनेमागृहात २० डिसेंबरपासून रिलीज होणार आहे. आमीर खानने या सिनेमात खलनायकाची भूमिका केली आहे. या सिनेमात आमीरचा डबल रोल असल्याचीही चर्चा आहे, हे सत्य असेल तर आमीर खानच्या फॅन्ससाठी हा सर्वात आनंदाचा क्षण असेल.

धूम-३ या सिनेमा चा ट्रेलर लॉँच करण्यात आला त्यावेळी आमीर खान खूपच कूल दिसत होता. अनेक दिवसांनंतर आमीर खानचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या आधी आमीर खानचा तलाश सिनेमा आला होता, पण बॉक्स ऑफिसच्या प्रेक्षकांना काही तो खास भावला नाही. सुरूवातीला धूममध्ये भूमिका केल्यानंतर अभिषेकही यात असणार आहे. गेल्या दोन सिनेमात अभिषेकने इन्स्पेक्टर जय दीक्षितचा रोल केला होता, तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता.

Leave a Comment