वॉशिग्टन – अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात दिवाळी साजरी करण्यासंबंधी स्वतंत्र प्रस्ताव सादर केले असून यात दिवाळीचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रस्तावांनुसार आता प्रथमच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी साजरी केली जाणार असून त्यात अनेक सांसद सहभागी होणार आहेत.
वरच्या सभागृहात दिवाळीसंबंधीचा प्रस्ताव सिनेटर मार्क वॉर्नर व जॅन कॉर्निन यांनी सादर केला व दिवाळी साजरी करण्यामुळे भारतीय, अमेरिकन व भारतीय वंशाचे अमेरिकन यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील असे सांगितले. गेल्या आठवड्यात सांसद जॉय क्राऊल व पीटर रोस्कमन यांनी खालच्या सभागृहात म्हणजे हाऊस ऑफ रिपब्लीकन मध्ये दिवाळीचा प्रस्ताव सादर केला होता. भारतीय मूळ वंशाचे अमेरिकन, जगभरात असणारे प्रवासी भारतीय व भारतीय नागरिक यांच्याविषयी अमेरिकेला आदर आहे असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते.
यंदा प्रथमच कॅपिटल हिल म्हणजे अमेरिकी संसदेत दिवाळी साजरी केली जात असून अनेक सांसद प्रथमच साजर्या होणार्या दिवाळीत सहभागी होणार आहेत. हा समारंभ लक्षावधी भारतीय, भारतीय मूळ असलेले अमेरिकन व अमेरिकावासियांसाठी खास महत्त्वाचा मानला जात आहे.