संघर्ष करणारी भूमिका करणार सोनाक्षी

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगामी काळात येत असलेल्या तिच्या ‘बुलेट राजा’ या सिनेमात संघर्ष करणा-या नायिकेची भूमिका करणार आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासाठी हा रोल आव्हानात्मक असणार असून त्यामध्ये ती यशस्वी होणार की नाही हे पाहण्यारसाठी आगामी काळात तिच्या सिनेमाची वाट पाहवी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हाचा ‘वन्स अपोन ए टाइम इन मुंबई दुबारा’ हा सिनेमा रिलिज झाला आहे. या सिनेमातील सोनाक्षीची भूमिका सर्वांना आवडली आहे. त्यामुळे सोनाक्षीने आगामी काळात येत असलेल्या ‘बुलेट राजा’ या सिनेमात थोडासा हतके रोल करायचे ठरविले आहे.

‘बुलेट राजा’ च्या दिगदर्शक तिग्मांशू धूलिया या सिनेमाबाबत बोलताना म्हणाले, सोनाक्षीने या सिनेमात कोलकातामध्ये राहत असलेल्या युवतीचा रोल केला आहे. ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईला जाते. सोनाक्षी अभिनेत्री होण्या‍साठी भोजपुरी सिनेमात देख्रील काम करण्यास तयार होते असे या सिनेमाचे कथानक आहे.

या ‘बुलेट राजा’ सिनेमात सोनाक्षी सिन्हाशिवाय सैफ अली खान, जिमी शेरगिल, रवि किशन, चंकी पांडे, विद्युत जमवाल आणि गुलशन ग्रोवर यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा आगामी काळात २९ नोंव्हे्बर रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment