वादग्रस्त वक्तव्याने अजित पवार पुन्हा अडचणीत

जालना- गेल्याा काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्याने अजित पवार वांरवार अडचणीत सापडत आहेत. तरीपण ते वादग्रस्त वक्तव्य करण्याचे काही सोडत नाहीत. बलात्कार करणा-याचा ‘बंदोबस्त’ करण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात अजितदादा बोलत होते. बलात्काराच्या वाढत्या घटनांचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘महिलांकडे पाहताना आईच्या किंवा बहिणीच्याच नजरेने पाहिले पाहिजे, असे सुसंस्कार केले पाहिजेत. मात्र, अत्याचार करणारे असतातच. अशांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. फाशी दिली पाहिजे. मी तर म्हटलं होतं, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याषसाठी कापूनच काढले पाहिजे. त्याला नाही कापायचे. काय कापायचे तुमच्या लक्षात आले. परत त्याला धाडसच नाही झाले पाहिजे.’

या त्यांच्या वक्तव्यने पुन्हाच एकदा ते अडचणीत सापडले आहेत. अशा प्रकारांबाबत माझ्यासारखा कार्यकर्ता स्पष्ट बोलतो. मीडीयावाले त्यावर फार काही लिहितात. पण माझा हेतू चांगला आहे’, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment