नागपुरात धावत्या बसवर गोळीबार; एक जखमी

नागपूर – चालत्या बसमध्येही नागरिक गुन्हेगारांपासून सुरक्षित नाही का?, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण नागपुरात चालत्या बसवर गोळीबार झाला आहे. या हल्लात 32 वर्षीय अभियंता गंभीर जखमी झाला आहे.

त्याचा या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे कळत आहे. नागपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर वडधामना गावाजवळ काल रात्री संजय ट्रॅवल्सच्या स्लीपर कोच बसवर गोळीबार झाला. पुण्याला चाललेले 32 वर्षांचे राहुल सायरे पहिल्याच बर्थवर झोपले होते. 11 वाजताच्या सुमारास बस वडधामना शिवारातून जात असताना बसवर गोळी झाडली गेली. ड्रायव्हरच्या बाजूच्या दिशेने आलेली गोळी बसचा पत्रा फाडत थेट राहुल यांच्या पोटात घुसली, त्यांचा आरडा ओरडा ऐकून बस थांबविण्यात आली त्यांना नागपूरच्या शुअरटेक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

दरम्यान, चालत्या बसवर झालेल्या गोळीबाराने पोलीसही चक्रावले आहेत. लुटीच्या किंवा शिकारीच्या उद्देशाने ही गोळी झाडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave a Comment