मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर

अहमदाबाद – पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकासाठी  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल मेमोरियल सोसायटीने लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित एक संग्रहालय उभारले असून त्याच्या उद्घाटनास मनमोहनसिग व नरेंद्र मोही हे दोघेही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे ३१ आक्टोबरला भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या महाकाय पुतळा उभारणीच्या कामाची कोनशीला ठेवणार आहेत. गुजराथेत हा जगातील सर्वाधिक उंच पुतळा उभारला जाणार आहे.

Leave a Comment