गेल्या काही दिवसांपासून छोटया पडद़यावरील फेमस डान्स रियलिटी शो “नच बलिए” पुढील भागात गुरमीत चौधरी, रित्विक धनजानी, बू्रना अब्दुल्ला, राजू श्रीवास्तव आणि काहीजण सहभागी झाले आहेत. त्याशिवाय अन्या काहीजण त्यांच्या जीवनसाथी सोबत डान्स फ्लोरवर थिरकतांना दिसणार आहेत. या “नच बलिए” च्या सीझनसाठी अभिनेत्री शिल्पा शेट़टी जज म्हणून काम पाहत असून ती या कामावार खूपच खूष आहे.
“नच बलिए” या कार्यक्रमात एकूण ११ सेलिब्रिटी जोडया आहेत. त्याशिवाय प्रमुख पाहूणे म्हणून गौतम रोडे आणि करण वाही हे काम पाहत आहेत. तर सेलिब्रिटी जज म्हणून शिल्पा शेट्टी-कुंद्रा, साजिद खान आणि टेरेंस लुईस सहभागी झाल आहेत.
“नच बलिए” या शोबाबत बोलताना अभिनेत्री शिल्पा शेट़टी म्हणाली, ‘मी या कार्यक्रमाचा एक हिस्सा झाल्याने मी खूप खुश आहे. मी या कार्यक्रमात नेहमीच निष्पक्ष आसते. जज म्ह्णनुन काम करीत असताना मी या जोडीची केमिस्ट्री देखील पाहणार आहे.’ तर साजिदचे लक्ष या कार्यक्रमात डान्स ऐवजी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर असणार आहे.