अक्षय कुमारच्या़ ‘गब्बर’ साठी करीनाचा डान्स

आगामी काळात येत असलेल्या अक्षय कुमारच्या ‘गब्बर’ या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर आयटम सागवर थिरकणार आहे. सुरूवातीला संजय लीला भंसाळी आणि शबीना खानच्याग ‘गब्बर’ या सिनेमात करीना कपूर व अक्षय कुमार मुख्य भूमिका करणार असे सांगतले जात होते. मात्र करीना या सिनेमात फक्त डान्स सादर करणार आहे.

याबाबत बोलताना शबीना म्हणाली, ‘ करीना या सिनेमात एक विशेष गीत सादर करताना दिसणार आहे. अजून हे गाणे कशा स्वरूपाचे आहे आणि याचे कुठे शुटींग होणार हे फायनल करण्यात आले नाही. या सिनेमातील गाणे करण्यासाठी करीना तयार झाली असून अक्षय आणि करीनाने यापूर्वी ‘रावडी राठौड’ या सिनेमात ‘चिनता ता ता चिता चिता’’ हे गाणे सादर केले होते.’

‘गब्बर’ हा सिनेमा २००५ साली आलेल्या ‘रमन्ना’ या तमिळ सिनेमचा रीमेक आहे. या सिनेमाची काहणी विद़यार्थ्यावर आधारित आहे. या सिनेमाचे शुटिंग पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्याेपासून मुंबईतील विविध लोकेशंसवर केले जाणार आहे.

Leave a Comment