आता मेल करा स्वहस्ताक्षरात

वॉशिग्टन – जगभरात सर्वाधिक युजर वापरत असलेल्या जीमेल या गुगल मेल सेवेने नवीन हँडरायटिंग टूल जीमेल युजरसाठी उपलब्ध करून दिले असून त्यामुळे भाषेचे अडथळे कमी होणार आहेत. कारण ५० पेक्षा अधिक भाषांतून युजर आता त्यांच्या हस्ताक्षरात मेल पाठवू शकणार आहेत. माऊस पॅड व कर्सरचा वापर करणारे युजरही आपल्या हस्ताक्षरात मेल टाईप करू शकणार आहेत. गुगल त्याचे टाईप्ड व्हर्जन करून ती मेल पाठवेल. मेल करताना समान शब्दही हे टूल देणार असून युजर त्यातून हवा तो शब्द निवडू शकणार आहे. गुगल डॉक्सवर वीस भाषांत हस्ताक्षरात मेल पाठविता येणार आहे.

गुगल प्रमुखाच्या मते या नव्या टूलमुळे इंटरनेट जगभरातील लोकांसाठी अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे. त्यामुळे भाषेची जी बंधने येतात तीही मोकळी होणार आहेत. त्यासाठी जीमेल व गुगल डॉक्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर लॅग्वेज सेटिंग असा ऑप्शन दिला गेला आहे. त्यावर उपलब्ध असलेल्या सर्व भाषांचा ऑप्शनमधून आपल्याला हवी ती भाषा निवडता येणार आहे. निवडलेल्या भाषेचा की बोर्डही उपलब्ध होणार आहे.

ज्या भाषांच्या बाजूला पेन्सिल आयकॉन असेल तेथे लिखित शब्द सपोर्ट इनपूट ऑप्शन अॅड करायचा व थेट मेनू बारच्या टॉपला जेथे आपण ईमेल करतो तेथेच थेट आपले पत्र लिहिता येणार आहे.

Leave a Comment