राहुल गांधींनी पात्रता सिद्ध करावी- शरद पवार

मुंबई – आम्ही यूपीए सरकारमध्ये घटक पक्ष जरी असलो तरी त्यांचा निर्णय हा आमचा निर्णय असं काही नाही. राहुल गांधी यांनी एक प्रशासक म्हणून आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी. उपाध्यक्ष होण्याअगोदर राहुल यांनी मनमोहन सिंग सरकारमध्ये सहभागी व्हायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पण राहुल हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील याबद्दल उत्तर देण्यास पवारांनी टाळले.

येणार्‍या निवडणुकीत भाजप असो अथवा काँग्रेस असो कोणत्याही एका पक्षाच सरकार येणं जरा अवघड आहे. भाजपच्या काही जागा वाढतील, काँग्रेसच्या काही वाढतील पण सत्तेवर येण्यासाठी कोणत्याही पक्षाला प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा घ्यावाच लागले. एखाद्यावेळेस परिस्थिती असी असेल की, प्रादेशिक पक्षांनाच पाठिंबा द्यावा लागेल असं भाकितही पवारांनी वर्तवले आहे.

यावेळी त्यांनी एक प्रशासक म्हणून राहुल गांधी यांनी अगोदर आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी असा टोला पवार यांनी राहुल यांना लगावला. तसंच येणार्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना बायपास करता येणार नाही. त्यांचा आधार घेण्याची परिस्थिती आता निर्माण झालीय. उद्या निवडणुका झाल्यात तर काँग्रेस प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देऊ शकते किंवा प्रादेशिक पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल. जर अशी आघाडी अस्तित्वात आली, तर चांगलंच होईल. त्यामुळे देशाला स्थैर्यही मिळू शकतं, असं म्हणून पवारांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली परखड भूमिका मांडली.

Leave a Comment