बॉलीवूडमध्ये इश्काजादे या सिनेमातून अर्जून कपूरने एंट्री केली आहे. अर्जुन कपूरचे वजन गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्यासाठी तो नेहमीच वेगवेगळया आयडीया शोधून काढत आहे. बॉलीवूडमधिल मंडळी सुध्दा त्याच्या वाढलेल्या वजनाची सतत चर्चा करताना दिसतात. त्यामुळेच अर्जून कपूरने वजन कमी करण्यासाठी अभिनेता सलमान खानची मदत घेतली आहे.
याबाबत अधिक बोलताना अभिनेता अर्जुनकपूर म्हणाला, ‘मी वाढलेल्या वजनामुळे खूप अडचणीत आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून मी वेट कमी करण्यासाठी एक वेगळी जंग लढत आहे. मी लहानपणी खूप आळसी मुलगा होतो. त्यामुळे माझो वजन काही प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे मी आत वजन कमी करण्यासाठी एक्सर्साइज आणि डायटिंग करीत आहे. त्याळमुळे आता माझे वन कंट्रोलमध्ये राहत आहे.’
चार वर्षापुवी माझे वजन केवळ १४० किलो होते. आता ते वजन कमी होवून ८० किलो इतके झाले आहे. वजन कमी करण्यासाठी मला अभिनेता सलमान खानची खुप मदत मिळाली. वजन कमी करण्यासाठी त्यांनी काही टिप्स मला दिल्या होत्या. त्याचे मी तंतोतत पालन करीत गेलो. त्या मुळे मला वजन कमी करता आले. खान्याच्या बाबतीत पण मी खूपच वर्कआउट केले आहे. त्यातमुळेच मी ख-या अर्थाने वजन कमी करू शकलो असल्यावचे ही अर्जून कपूरने स्पष्ट केले.